आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, बड्या वकिलाने केला खळबळजनक आरोप…


मुंबई : दिशा सालियानचे वडिल सतिश सालियान आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत आपली तक्रार नोंदवली आहे. दिशा सालियनची हत्या झाली तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सतिश सालियान आणि त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियन प्रकरणात निलेश ओझा यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली आणि माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, नार्कोटेक्स ब्युरोच्या तपासात हे आढळून आलंय आदित्य ठाकरे हे ड्रग्स बिझनेसमध्ये सहभागी आहेत. त्यासंदर्भाती इतंभू माहिती आम्ही या अर्जात दिली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोरिया यांच्या फोन कॉल्ससह समीर खान नावाच्या व्यक्तीची डीएफीपी नावाची कंपनी होती,जी ड्रग्सचे सिंडिकेट चालवत होती.

आदित्य ठाकरे यांचं नाव ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर समीर वानखेडे असो किंवा नार्कोटेक्स ब्युरोचे इतर अधिकारी असतील, त्यांना आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्यासाठी कोणी थांबवलं, असा सवाल ओझा यांनी विचारला आहे. त्यामध्ये, किती कोटींची डील झाली असाही सवाल ओझा यांनी विचारला.

पोलिस आयुक्तालयात आमची जॉईंट सेक्रेटरी यांच्यासोबत चर्चा झाली, त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा करुन संबंधित प्रकरणात ही तक्रार दाखल करुन घेत असल्याचे म्हटले. त्यानुसार, आता एफआयआर दाखल झाल्याचेही ओझा यांनी सांगितले. आमच्या तक्रारीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आरोपी आहेत, अशी माहिती निलेश ओझा यांनी दिली.

महत्वाची गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रगच्या व्यवसायाचा आरोप या वकिलाने केला आहे आणि या संदर्भात आपल्याकडे पुरावे आहेत असे त्याने स्पष्ट केले आहे. समीर खान नावाच्या व्यक्तीची डीएएफपी नावाची कंपनी होती.

जी ड्रग्सचे सिंडिकेट चालवत होती आणि आदित्य ठाकरे वर कारवाई झाली असती, परंतु समीर वानखेडे आणि नार्कोटिक्स ब्युरोच्या इतर अधिकाऱ्यांना थांबवण्यात आले. त्यासाठी किती कोटींची डील झाली? या संदर्भातील पुरावे आमच्याकडे आहेत असे ओझा म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!