अभिनेता गोविंदा देणार पत्नी सुनीताला घटस्फोट, ३७ वर्षांचा संसार मोडणार? काय आहे नेमकं कारण?

मुंबई : गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. पण आता ते विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांचाही संसार मोडणार असल्याचं म्हंटले जात आहे. मतभेदामुळे ते वेगळे होणार आहेत, अशी चर्चा आहे.

सुनीताने मागील काही मुलाखतींमध्ये सांगितले होते की, गोविंदा तिच्यासोबत राहत नाही. त्यांच्या अफेअरबद्दलही तिने गंमतीने सांगितले होते. गोविंदा आणि सुनीता यांच्या विभक्त होण्यामागे ३० वर्षीय मराठी अभिनेत्री असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, याबाबत गोविंदा किंवा सुनीता यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
गोविंदा आणि सुनीता नेहमीच त्यांचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्यास प्राधान्य देतात. पण तरीही ते अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांबद्दल प्रेमाने बोलताना आणि विनोद करताना दिसतात. मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्यात बिनसले असल्याच्या अफवा पसरत आहेत.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने मोठा खुलासा केला होता की ती आणि गोविंदा सध्या एकत्र राहत नाहीत. यानंतरच लोकांनी गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट होणार असल्याची शंका व्यक्त केली होती.

अशातच आता Reddit वर गोविंदाच्या बाबत एक पोस्ट व्हायरल होत असून यात अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीताचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले आहे. यात सांगण्यात आलं आहे की गोविंदा आणि सुनीता हे दोघे वेगवेगळे राहत आहे.
सुनीता ही सध्या गोविंदाच्या बाजूच्या बंगल्यात राहत असून दोघांमधील अनेक गोष्टी जुळत नाहीत. सुनीताने गोविंदाचे अनेक अफेअर्स सुद्धा सहन केले, यासोबतच तिने गोविंदाच्या आईची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली.