मोठी बातमी! शिंदे गटातील आमदाराचा अपघात, पोलीस व्हॅनची कारला जोरदार टक्कर…


अमळनेर : पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. यामुळे सुरुवातीला गोंधळ उडाला होता.

हा अपघात अमळनेर शहराजवळ असणाऱ्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ झाला आहे. त्यांच्याच ताफ्यातील पोलीस सुरक्षा वाहनाने पाटील यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. यावेळी गर्दी देखील झाली होती.

या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. चिमणराव पाटील यांनी सीट बेल्ट लावला होता, त्यामुळे त्यांना किरकोळ इजा झाली. अपघातानंतर ते पारोळ्याकडे रवाना झाले. यावेळी पोलीस उपस्थित होते.

चिमणराव पाटील हे चोपडा येथे कामानिमित्त जात होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा ताफ्यात असणाऱ्या पोलीस व्हॅनने मागून पाटील यांच्या कारला जोरदार धडक दिली. यामुळे हा अपघात झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!