Accident News : शिवशाही बसचा भीषण अपघात! १० जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी…


Accident News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच अपघाताची घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. या अपघातात शिवशाही बस अचानक उलटल्याने दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डवा गावाजवळ ही घटना घडली. काल दुपारी एक वाजता नागपूरहून गोंदियाकडे येणारी शिवशाही बस अचानक उलटल्याने दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. Accident News

दरम्यान सरकारने अपघातातील मृतांच्या वारसांना तातडीने दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या अपघातातील मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता असून जखमींना तातडीने गोंदियातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सूचना…

जखमींना तातडीने व योग्य उपचार करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. आवश्यकता भासल्यास येथील जखमींना नागपूरला हलवण्याची व्यवस्था करा अशी सूचना देखील गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!