दिवे घाटात टॅंकरचे नियंत्रण सुटून वाहनांना चिरडले ! दोघांचा जागीच मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता !!

हडपसर : सासवड -हडपसर पालखी मार्गावरील दिवे घाटात एका टँकरचे नियंत्रण सुटून तो टॅंकर दोन ते तीन वाहनांना दिलेल्या धडकेत दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून टॅंकर दरीत कोसळला आहे.
दिवे घाटात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून दरीत पडलेल्या टॅंकर मधील नागरीक आढळले का म्हणून मदतकार्य सुरू आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार टँकर हा सासवड मार्गावरून पुण्याकडे निघाला असताना दुचाकीला जोरदार धडक दिली. तसेच टॅंकर चालकाचा ताबा सुटल्याने टॅंकर सुमारे दोनशे ते तीनशे फूट दरीत कोसळला आहे. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस दाखल असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Views:
[jp_post_view]