Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू नेमकं कसा झाला? आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून खरी माहिती आली समोर…

Abhishek Ghosalkar : दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या स्थानिक गुंड आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिस नोरोन्हाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
अशातच आता घोसाळकर यांचा मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.घोसाळकर यांचा मृत्यू कसा झाला याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येत तिसऱ्या व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच घोसाळकर यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. Abhishek Ghosalkar
पोस्टमार्टमच्या अहवालानुसार, हेमरेज आणि अतिरक्तस्त्रावामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यू झाला आहे. हे शविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय. त्याचबरोबर घोसाळकर यांना एकूण ४ गोळ्या लागल्या होत्या. तीन आरपार गेल्या तर एक गोळी शरिरातच मिळाल्याचं अहवालात स्पष्ट झाले आहे. गोळी लागून मृत्यू झाल्याने पोस्टमार्टमची संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली होती.
जे जे रुग्णालयाचा अहवाल गुन्हे शाखेला प्राप्त झालाय. डॉक्टरांच्या पॅनलच्या मार्गदर्शनाखाली पोस्टमार्टम करण्यात आले. गोळी लागून मृत्यू झाल्याने पोस्टमार्टमची संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली होती.
या रिपोर्टमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट करण्यात आले आहे. पोस्टमार्टमच्या अहवालानुसार, हेमरेज आणि अतिरक्तस्त्रावामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यू झाला. शविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच घोसाळकर यांना एकूण ४ गोळ्या लागल्या होत्या. तीन आरपार गेल्या तर एक गोळी शरिरातच मिळाल्याचं अहवालात स्पष्ट झाल आहे.