Abdul Karim Tunda : १९९३ च्या साखळी स्फोटातील आरोपी अब्दुल करीमची निर्दोष मुक्तता, टाडा कोर्टाचा निर्णय…


Abdul Karim Tunda : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

बॉम्बस्फोटानंतर तब्बल ३१ वर्षांनंतर न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागेले होते. आता न्यायालयाने अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता केली आहे. यासह टाडा न्यायालयाने इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी घोषित केले आहे.

१९९३ मध्ये कोटा, लखनऊ, कानपूर, हैदराबाद, सूरत आणि मुंबई या शहरांमधील रेल्वेमध्ये साखळी बॉम्पस्फोट झाले होते. या प्रकरणावरील सुनावणीवर सरकारी वकीलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, टुंडा याची कुठल्या कारणांमुळे सुटका झाली, यावर निकालाचे वाचन केल्यानंतर टिप्पणी करता येईल. Abdul Karim Tunda

मुंबई बॉम्ब स्फोटात सहभागी होण्यापूर्वी टुंडाने जालीस अन्सारीसोबत मुंबईत मुस्लीम समुदायासाठी काम करण्याच्या उद्देशाने ‘तंजीम इस्लाह उल मुस्लीमीन’ नावाची संस्था स्थापन केली होती.

कोण आहे टुंडा?

मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी होण्यापूर्वी टुंडाने जलीस अन्सारी सोबत मुंबईतील मुस्लिम समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने ‘तन्झीम इस्लाह-उल-मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना केली. मध्य दिल्लीतील दर्यागंजमधील छत्तालाल मियाँ भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पिलखुआ गावातील बाजार खुर्द भागात आपल्या मूळ गावी सुतार म्हणून काम करायला सुरुवात केली.

तो त्याच्या वडिलांना मदत करू लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर टुंडाने उदरनिर्वाहासाठी भंगाराचे काम सुरू केले आणि कट्टरपंथी जिहादी दहशतवादी बनण्यापूर्वी कपड्यांचा व्यवसायही केला. ८०च्या दशकात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आला. टुंडाने मूलतत्त्ववाद स्वीकारला.

अब्दुल करीम टुंडा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. टुंडाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून दहशत पसरवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा दावाही केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!