आम आदमी पार्टीचे आमदार महिलेसोबत लॉजवर, महिलेचा नवरा आला अन्…

गुजरात : गुजरात येथील आप आमदार भाई भयानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ते एका महिलेसोबत ८ जून रोजी OYO हॉटेलमध्ये गेले होते.
त्यांनी रूममध्ये प्रवेश केला परंतु काही वेळात तेथे त्या महिलेचा पती आला आणि त्या आमदाराने तेथून पळ काढला. रंया व्हायरल व्हिडिओमुळे गुजरातच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ‘हा व्हिडिओ सूरतच्या कडोदरा भागतील सूरज गेस्ट हाऊसचा आहे. यामध्ये जूनागढच्या विसावदर विधानसभा क्षेत्राचे आमदार भूपत भाई भयानी हॉटेलच्या काऊंटरजवळ उभे आहेत, त्यांच्याशेजारी एक चेहरा बांधलेली एक महिला आहे.
ते दोघेही रजिस्टरमध्ये नोंद करत आहेत. त्या दोघांनीही रूममध्ये प्रवेश करताच त्यामागून महिलेचा पती आला. त्याच क्षणी भयानी यांनी चेहऱ्यावर रुमाल झाकून तेथून पळ काढला.
तसेचसदर आमदार आणि महिलेने एका रूमसाठी ८०० रूपये भाडे भरल्याची माहिती आहे. मात्र काही वेळात महिलेचा पती आल्याने त्यांना जास्त वेळ थांबता आले नाही.
हा व्हिडिओ ८ जून रोजीचा असून सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरीही यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.