धक्कादायक! हडपसर येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल..


पुणे : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वैदवाडी येथील एम के एम कॅन्टीन (केरला हॉटेल) या ठिकाणी काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी हॉटेलमधीलच दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २० ऑगस्ट २०२३ पासून वेळोवेळी घडला.

शहजाद इमामन अन्सारी (वय ३० रा. झारखंड) आणि मोहम्मद सलीम इद्रिस शेख (वय. ४३) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर परिसरातच राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी काम करत असलेल्या कॅन्टीनमधील कर्मचारी शहजाद इमामन अन्सारी याने हॉटेलमध्ये कोणी नसताना फिर्यादी यांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर दुसरा आरोपी मोहम्मद सलीम इद्रिस शेख याने वारंवार फिर्यादी यांना “मुझे भी चाहिये, मुझे भी करना है” असे बोलून त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. यानंतर मात्र फिर्यादी तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!