पिंपरीत खळबळ! दिवसाढवळ्या गोळ्या झाडून तरुणाचा खून..


पिंपरी : पिंपरी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  चिखली टाळगाव कमानी शेजारी सोन्या तापकीर या तरुणाचा अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून खून केला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सोन्या तापकीर (वय.२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे . घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेची घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्या तापकीर याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सोन्या तापकीर गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत. सध्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सध्या पोलिस प्रशासन याबाबत तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!