रस्त्याने जाणार्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले, दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे : हॉटेलमधील काम संपवून घरी जात असलेल्या तरुणाला वाटेत अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणार्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना बंडगार्डन रोडवरील तनिष्क ज्वेलर्स समोर सोमवारी (ता.२१) मध्यरात्री एक वाजता घडली.
ओंकार संजय कसाळकर (वय २०, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी रोड, विश्रांतवाडी) याला अटक केली असून त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गाणाराम वेण्णाराम देवासी (वय ३१, रा. हॉटेल मस्त कलंदर, ताडीवाला रोड, मुळ रा. राजस्थान) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी देवासी हे नुकतेच राजस्थानातून पुण्यात आले असून हॉटेल हिडन पॅलेसमध्ये वेटर म्हणून काम करतात. सोमवारी मध्यरात्री ते काम संपवून घरी ताडीवाला रोडला जात होते. वाटेत तनिष्क ज्वेलर्ससमोरील रोडवर तिघे जण मोटारसायकलवरुन आले.
त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचा मोबाईल व खिशातील २ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दोघा अल्पवयीनांसह तिघांना पकडले. सहायक पोलीस निरीक्षक लिंगाडे तपास करीत आहेत.