पिंपरीत खळबळ! जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने युवकाला संपवलं; हत्येनंतर गाठले पोलीस ठाणे अन्..

पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी हा पोलिसांसमोरील मोठा प्रश्न बनला आहे. पैसा, ड्रग्स, अनैतिक संबंध यातून गुन्हेगारी घडत असताना, आता पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीने मित्राच्या मदतीने एकाची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

एका जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने एका युवकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेला तरुण हा जिमट्रेनर तरुणीला वारंवार त्रास देत होता. त्यातून ही घटना घडली असल्याचं समोर आली आहे.
मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे असे आहे. तर आरोपीचे नाव यश पाटोळे आणि प्रांजळ तावरे अशी आहे. लल्ला आणि आरोपींची ओळख हे जिम मध्येच झाली होती. यश आणि प्रांजळ या दोघांचं पार्टनरशिपमध्ये प्रोटीन पझल शॉप आहे.

याचं शॉपमध्ये काल दुपारी गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे हा आला होता. त्यावेळी, त्याने प्रांजलला शिवीगाळ केली. वारंवार होणारी शिवीगाळ आणि पैश्यांची मागणी, या त्रासाला प्रांजळ कंटाळली होती. त्यातूनच ही हत्याकांडाची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, जिम ट्रेनर प्रांजलसोबत काल दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा एकदा लल्ला वर्पे याच्याकडून त्रास देण्याचा तोच प्रकार घडला. त्यावेळी प्रांजलने गोपीनाथच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिने आणि यशाने मिळून लोखंडही रॉड आणि पहारने मारहाण केली. यात गोपीनाथ गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेतील लल्लाला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले.
मग प्रांजल आणि यश दिघी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले अन् घडला प्रकार पोलिसांना सांगितला. प्रांजल आणि यश ज्या जिमचे ट्रेनर आहेत, त्याच जिममध्ये गोपीनाथ जिमला येत होता. तिथंच यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली.
मात्र, गोपीनाथ प्रांजलकडे पैशांची मागणी का करत होता? तो तिला शिवीगाळ करुन का त्रास देत होता? असा आरोप केला जता आहे. मात्र, हे अद्यापही अस्पष्ट आहे. आता, पोलीस तपासात प्रांजल आणि यशकडून या बाबी समोर येतील. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.