शरद पवारांना मोठा धक्का! अत्यंत जवळचा नेता अजित पवार यांच्याकडे जाणार…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिन्याभरापूर्वी मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट पक्षात पडले आहेत. अजित पवार यांच्याकडे सर्वाधिक आमदारांचं बळ आहे.
तर शरद पवार यांच्यासोबत काही आमदार आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या गटातील आमदारांची संख्या आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे. कारण काही आमदार हे अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
यामध्ये शरद पवार यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू असेलेल्या नेत्याचा समावेश आहे. संबंधित नेता हा महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अतिशय महत्त्वाच्या पदावर होता.
तीन आमदार अजित पवार यांच्या पाठीमागे जाणार आहेत. या तिघांमध्ये शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक यांचा समावेश आहे. तर दुसरे आमदार हे महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे असल्याची माहिती मिळत आहे.
तिसरं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. पण तीन जण शरद पवार यांच्या गटाला सोडचिठ्ठी देवून अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, संबंधित तीनही आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे आमदार लवकरच अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.