लोणी काळभोर येथे शिक्षका पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून पोलीस हवालदाराने दिली जीवे मारण्याची धमकी, घटनेने उडाली खळबळ..


लोणी काळभोर : शिक्षका पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून पोलीस हवालदाराने तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पतीसह सासू दीर व जाऊ या़चेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुणे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. १२ वर्षापूर्वी त्यांचा विवाह कोंढवा पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारासोबत झाला असून त्यांना ७ वर्षाचा मुलगा आहे. घरातील शुल्लक कारणावरून सासरकडील मंडळींनी अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ करून मारहाण करतात या कारणावरून त्या गेल्या दिड वर्षापासून वेगळ्या रहात आहेत.

पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार सन २०१४ ते २०२४ या १० वर्षांच्या कालावधीत कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सदर प्रकार घडला असून पोलीस हवालदाराने शिक्षिका पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच तु माझ घर सोड, अन्यथा मी तुलासुद्धा प्रतिभासारखं जाळुन मारेन” माझे कोणी काही वाकड करणार नाही. जसा मी पहिला सुटलो तसा आता पण सुटेन. पण तुला आणि तुझ्या मुलाला मी संपवेन. अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच पिडीता गरोदर असताना पती, सासू, दीर व जाऊ यांनी संगनमत करून जबरदस्तीने गर्भपात केला आहे.

       

याप्रकरणी ३४ वर्षीय पिडीत शिक्षिकेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!