हवेली तालुक्यात लॅपटॉप चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या, सुमारे २ लाखांचा मुद्देमाल जप्त, लोणी काळभोर पोलिसांची कारवाई..


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील वाघोली परिसरात लॅपटॉप चोरून पळून चाललेल्या एका परप्रांतीय अट्टल चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडी येथे जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

त्याच्याकडून १ लाख ९५ हजार ४२१ रुपये किंमतीचे ५ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सागर नागराज (वय ३१, रा. महादनुर, ता. अंबुर, जि. वेल्लुर, राज्य तामिळनाडु) याला अटक करण्यात आले आहे.

लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील पोलिस अंमलदार चक्रधर शिरगिरे व शैलेश कुदळे हे बुधवार (१३ ऑगस्ट) रोजी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना कुंजीरवाडी येथे असलेल्या चिंतामणी पार्क प्लॉटींगजवळ एक इसम संशयीतरित्या उभा असून त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची जड वजनाची बॅग अडकवली आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिस पथक सदर ठिकाणी गेले असता चोरट्याला पोलिस आल्याची चाहुल लागताच त्याने तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये चोरीचे ५ लॅपटॉप मिळुन आले. अधिक चौकशीत त्याने मंगळवार (१२ ऑगस्ट) रोजी वाघोली येथून पहाटे चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस हवालदार गणेश सातपुते, रामहरी वणवे, तेज भोसले, अण्णा माने, संभाजी देवीकर, बापूसाहेब वाघमोडे, पोलिस अंमलदार चक्रधर शिरगिरे, शैलेश कुदळे, बाजीराव विर, योगेश पाटील, सूरज कुंभार, प्रदीप गाडे, राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, प्रवीण ध डस यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!