पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! नवीन विषाणूचा झाला शिरकाव, २२ संशयित आढळले, जाणून घ्या संपूर्ण माहिती…


पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात एका नवीन विषाणूचा शिरकाव झाला आहे. गुईलेन बॅरे सिंड्रोम असे या विषाणूचे नाव आहे. या विषाणूच्या साधारण २२ संशयित रुग्णांची नोद झाल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे

या घटनेनंतर संशयित रूग्णांचे नमुने आयसीएमआर एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.या तपासणीअंती या आजाराचा निष्कर्श निघणार आहे. तत्पुर्वी हा नवीन आजार काय आहे? या आजाराचा नेमका कुणाला धोका आहे? ते आपण जाणून घेऊयात..

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायुंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते.

दुर्मिळ असा गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करू शकतो. जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपाय मुंग्या येणे. या आजाराचे कारण सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे.

पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले आहे. त्याचवेळी काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते.

काय आहेत लक्षणे?

अंग दुखणे, चालताना तोल जाणे, चेहरा सूजने, चालताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लूळ पडणे.

उपचाराने टळेल धोका..

जीबीएस किंवा एआयडीपी या आजारावर आयव्हीआयजी हे इंजेक्शन देणे महत्त्वाचे आहे. हे इंजेक्शन महागडे असून तीन दिवसांच्या आत दिल्यास रुग्णांवरील धोका टळतो. मात्र, हे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीमध्येच हिताचे ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!