अल्पवयीन मुलानेच घेतला आईचा जीव, रागात आला अन्…!! हत्येचे धक्कादायक कारण आले समोर

गोंदिया : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने चक्क आपल्या आईचाच जीव घेतला. खर्चासाठी पैसे न दिल्याने या अल्पवयीन पोराने आपल्या आईचा गळा घोटून हत्या केली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिच्या 17 वर्षीय मुलावर रावणवाडी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पोलीस आणखी सखोल तपास करत आहेत. भारती सहारे गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे आपल्या 17 वर्षीय मुलासोबत राहत होत्या. पतीच्या निधनानंतर गावातच अंडी विकून त्या आपला उदरनिर्वाह करायच्या. भारती यांना त्यांचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत मागायचा. यातून त्यांच्यात नेहेमी वाद होत होता.
घटनेच्या रात्रीही असेच या अल्पवयीन मुलाने आपल्या आईला खर्चासाठी पैसे मागितले. यामुळे वाद वाढला. याच वादात रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले. यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून महिलेचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली.
त्या अल्पवयीन मुलाने नंतर नातेवाईकांना आईच्या मृत्यू नैसर्गिक झाला असे सांगून अंत्यसंस्कार केले. नंतर संशय आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. या तपासाअंतर्गत पोलिसांनी मृत महिलेचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढले. त्यानंतर या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. नंतर मुलावर संशय वाढला, तपासात पोलिसांना मुलावर संशय आला.
दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रावणवाडी पोलिसांनी 17 वर्षीय विधी संघर्षीत मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.