मोठी बातमी! ठाकरेंना मोठा धक्का? माजी खासदार अजितदादा गटाच्या संपर्कात; राज्यसभेसाठी पडद्यामागे जोरदार लॉबिंग


मुंबई : राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. इच्छुकांची संख्या वाढत असतानाच आता या शर्यतीत इतर पक्षांतील काही नेत्यांच्याही नावांचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव चर्चेत असतानाच आता आणखी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एका माजी खासदारानेही राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या इच्छुकाला पक्षाकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समजते.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अवघ्या दोन दिवसांवर आली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार निश्चित केलेला नाही. पक्षाकडून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. याशिवाय प्रमोद हिंदुराव, अविनाश आदिक आणि समीर भुजबळ यांचीही नावे चर्चेत आहेत.

दरम्यान, पक्षाबाहेरील एखाद्या नेत्याला उमेदवारी देण्याचाही पर्याय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून तपासला जात असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी स्वीकारण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, विचारधारात्मक कारणांमुळे त्यांनी या प्रस्तावाला नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या घडामोडींना अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते मुंबईत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यसभेचे तिकीट नेमके कुणाच्या गळ्यात पडणार आणि ठाकरेंच्या माजी खासदाराच्या नावामागचे गूढ काय आहे, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!