मद्यप्रेमींना मोठा झटका! ‘या’ जिल्ह्यांमध्ये सलग ४ दिवस दारूबंदी; काय आहे कारण?


मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मतदान आणि मतमोजणीच्या कालावधीत नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये दारुविक्रीवर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली असून, यासंदर्भातील अधिकृत आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनाने 16 जून दुपारी 4 वाजल्यापासून मद्यविक्री बंदी लागू केली आहे.

ही बंदी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायम राहणार असून, 22 जून रोजी मतमोजणीच्या दिवशीही संपूर्ण जिल्ह्यात दारुविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

या निवडणुकीत 623 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान निष्पक्ष आणि सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, मद्यविक्री बंदीच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातही विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित भागांमध्ये चार दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!