शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा शाळकरी मुलावर हल्ला, पुण्याच्या खेडमधील घटना…

पुणे : राज्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हालचाली वाढल्या असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. काही ठिकाणी तर बिबट्याचे हल्लेही झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अशातचह आता पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथून देखील बिबट्याच्या हल्ल्याची बातमी समोर आली आहे. खेडच्या भोंडवेवस्तीत शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे.

शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हा हल्ला केल्याचा अंदाज आहे. तर बिबट्याच्या या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून या चिमुकल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.

यश गणेश भोंडवे असे बिबट्याने हल्ला केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. सुदैवाने या घटनेत जीव वाचला असून मोठी घटना टळली आहे. मात्र बिबट्यांच्या वावर आणि दहशतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
Views:
[jp_post_view]
