पुण्यात हनीट्रॅपमध्ये अडकला हॉटेल व्यावसायिक, महिलेने ‘एवढ्या’ लाखांची खंडणी उकळली, मैत्रीच्या जाळ्यात ओढले अन्…


पुणे : हाॅटेल व्यावसायिकास मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हाॅटेल व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून आराेपी महिलेविरुद्ध विमानतळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी महिला हाॅटेल व्यावसायिकाच्या मित्राची पत्नी आहे. आर्थिक व्यवहारांतून त्या दाेघांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण झाले. त्यानंतर महिलेने हाॅटेल व्यावसायिकाला विविध प्रकारे त्रास देत त्याच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली आणि बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करून नातेवाइकांमध्ये बदनामी करण्याची धमकी दिली.

दरम्यान, घाबरलेल्या फिर्यादीने तिला १ लाख २० हजार रुपये दिले. त्यानंतरही महिलेने हे प्रकरण मिटवावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. हाॅटेल व्यावसायिकाने तिला आणखी ६० हजार रुपये दिले.

यासह आराेपी महिलेने माझ्या कुटुंबीयांना धमकावून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर महिला पैशांसाठी सातत्याने धमकावत होती. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!