खाजगी जमिनीवर बेकायदा ताबा टाकून जागामालकाला मारहाण केल्याप्रकरणी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सदस्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल…


लोणी काळभोर : खाजगी जमिनीवर अतिक्रमण करून पत्रा शेड व बोर्ड मारुन जागामालकाला मारहाण केल्याची घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात शनिवार (८) ते रविवार (९ नोव्हेंबर) या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सदस्यांसह ७ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुनिल रामचंद्र थोरात (वय ४३, रा. येळपणे ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य

प्रितम त्रिंबक गायकवाड, त्यांचा मुलगा निल प्रितम गायकवाड (दोन्ही रा. कदमवाकवस्ती ता. हवेली जि.पुणे) यांचे समवेत ४ ते ५ अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       

सविस्तर माहिती अशी की, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात गट नंबर ९४२ व ९४३ मध्ये सुनिल थोरात यांची मालती रामचंद्र थोरात यांच्या नावे ४४ आर ऐवढी जमिन होती. घरामध्ये आर्थिक अडचण निर्माण झाल्याने सदर जमिन मालती थोरात यांनी सन २०११ मध्ये विक्रीस काढली. त्यावेळेस फुरसुंगी येथील संतोष ठकसेन पवार, प्रजित दिनकर हरपळे व चंद्रकांत रामदास हरपळे यांनी सदर जमिन विक्री करण्यात आली.

जागामालक संतोष ठकसेन पवार, प्रजित दिनकर हरपळे व चंद्रकांत रामदास हरपळे यांनी सदर जमिनिमध्ये घरबांधणी करीता प्लाटींग करून विक्री करण्यास सुरवात केली. त्यानंतर फिर्यादी सुनिल थोरात, त्यांचे भाऊ अनिल थोरात, संतोष थोरात व बहीण भारती चंद्रकांत भालेराव यांनी गट नंबर ९४२ मध्ये ५.६ आर ऐवढी जमिन विकत घेतली. जमिनीचे खरेदीखत झाल्यानंतर जमिनीच्या मालकांनी पवार यांच्यासह तेथे जागा विकत घेतलेल्या लोकांना ताबा दिला आहे. काही लोकांनी तेथे राहण्याकरीता घरे देखील बांधले आहेत.

८ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत प्रितम गायकवाड, निल गायकवाड यांनी सुनिल थोरात यांच्या जमिनीमध्ये बेकायदा जमाव जमविला. व पत्रा शेड व बोर्ड मारुन अतिक्रमण केले. तसेच त्यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. अशी फिर्याद सुनिल थोरात यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!