अंघोळ करण्याच्या कारणावरुन दोन गटांत तुंबळ मारामारी! कोरेगावमूळला एका गटावर ऑट्रोसिटी कायद्याने गुन्हे दाखल …


उरुळी कांचन : गायरान जमिनीवरील वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली. रविवारी (ता. 27) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हि घटना असून याप्रकरणी दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी एक तक्रारदर व स्वप्निल पांडुरंग मोरे (वय 27, व्यवसाय – टेंपो चालक रा. कोरेगाव मूळ) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वप्निल पांडुरंग मोरे, विजय मारुती शिंदे, केतन बाळासो सोनवणे (रा. सर्व कोरेगाव मूळ, मोरे वस्ती, ता. हवेली) तसेच समाधान परशुराम अवचट व सारिका प्रकाश पाथरकर (रा. दोघेही कोरेगाव मूळ, मोरे वस्ती ता. हवेली) यांच्याविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

पहिल्या तक्रारीनुसार स्वप्निल मोरे विजय शिंदे, व केतन सोनवणे हे गायरान जागेमध्ये सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आंघोळीसाठी असलेल्या न्हाणी (बाथरूम) शेजारी खड्डे घेत होते. यावेळी तक्रारदार यांनी खड्डे घेत असताना त्यांना तुम्ही आमचे न्हाणी जवळ कशाला खड्डा खांदता आम्ही आंघोळ कसे करणार असे विचारले. यावेळी स्वप्निल मोरे म्हणाला की जागा तुमच्या बापाची नाही हे गायरानाची जागा आहे. यावेळी फिर्यादी यांनी स्वप्नीलला तू व्यवस्थित बोल असे सांगितले.

तरीही स्वप्निलने जातीवाचक शिवीगाळ करत ढकलून दिले. यावेळी स्वप्निलच्या हातात असलेली पार पडून फिर्यादी या जखमी झाल्या.
यावेळी फिर्यादी व त्यांचा भावाला आरोपींनी हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच स्वप्निल मोरे याने मारहाण करत वीट फेकून डावी बाजूला मारली. याशिवाय तिच्या भावाची स्कुटी फोडून नुकसान करण्यात आले. त्यानुसार स्वप्निल मोरे, विजय शिंदे, केतन सोनवणे विरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कायदा कलम – गु.र.नं. 221/2025
भारतीय न्याय संहिता कायदा कलम – 118(1),125a,115(2),324(4),352,3(5) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत केतन सोनवणे यांचे घराशेजारी गायरान जागेमध्ये सार्वजनिक गणपती बसविणे कामी स्वप्नील मोरे व त्यांचे मित्र किशोर अडसूळ, आकाश घटमाळी, अविनाश शिंदे, केतन सोनवणे असे सर्वजण जागा स्वच्छ करीत आहेत. जागा स्वच्छ करीत असताना
सारिका पाथरकर व तिचा भाऊ समाधान अवचट त्या ठिकानी आले व तुझ्या बापाची जागा आहे का तू येथे कोणाला विचारून स्वच्छता करत आहे असे म्हणत फिर्यादी मोरे यांचा शर्ट धरून धक्काबुक्की सुरु केली.

यावेळी फिर्यादी मोरे यांच्या आजी कांताबाई मोरे या मध्ये येऊन सारिका पाथरकर हिला समजावत असताना समाधान अवजट याने तेथे पडलेला दगड त्याचे हातामध्ये घेऊन तू माझी बहिणीला बोलतो का असे म्हणून त्याचे हातातील दगड फेकून मारल्याने तो दगड कांताबाई मोरे यांच्या डोक्यात गंभीर जखमी केले. याप्रकरणी समाधान अवचट व सारिका पाथरकर या दोघांवर 219/2025 बी.एन.एस.2023 कलम 118(2), 118(1) 125,(a).115(2)352,351(2)3(5.) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे करीत आहेत.

गायरान जागेवर बंगल्याची कामे सुरु

कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गायरान जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून मोठमोठ्या बंगल्याची कामे सुरु आहेत. हे सर्व ग्रामपंचायतीला माहिती असूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत मात्र बघ्यांची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!