लाडक्या बहिणींना दणका ; तब्बल २६ लाख लाडक्या बहिणी अपात्र, सरकार वसूली करणार?

पुणे : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण या योजनेमुळे मोठ यश मिळालं. या योजनेतील हप्ता 1500 वरून 2100 केला जाईल असं महायुतीने नमूद केलं होतं मात्र तो अद्याप निधी वाढवला नसल्याने महिला नाराज असताना आता या योजनेतून तब्बल २६ लाख महिलांना अपात्र केले असल्याचे माहिती स्वतः महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. या अपात्र महिलांकडून सरकार वसुली करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते की, २६ लाख ३४ हजार महिला विविध कारणांनी अपात्र ठरल्या आहेत. याचसोबत १४२९८ पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, आता या अपात्र महिलांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. २६ लाख महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, या महिलांनी महिन्याकाठी १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांना आर्थिक मदत मिळावी, म्हणून सुरु केली. ही योजना पुरुषांसाठी नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही पैसे वसूल करु. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अपात्र महिलांवर सरकार कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
