मोठी बातमी! अजित पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला मोठा निर्णय..

मुंबई : कालचा रविवार महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात एक सुपर रविवार ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात आता तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे आमदार फोडून अजित पवारांनी एनडीएमध्ये प्रवेश केल्याचे प्रकरण आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले आहे.
महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांच्यासह सर्व नऊ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाला ईमेलही पाठवण्यात आला आहे.
पाटील म्हणाले की, आम्ही सभापतींना अपात्रतेची नोटीस दिली आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर ठोस कागदपत्रे सादर करू. पक्ष सोडण्याच्या निर्णयाची माहिती कोणालाही न दिल्याने नऊ नेत्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले. पाटील पुढे म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे.
दरम्यान, दादांनी पुन्हा मोठा राजकीय भुकंप केल्याचे दिसून आले असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता येणाऱ्या काळात अजून काय घडामोडी घडणार हे लवकरच समजेल.