पुण्यात खळबळ! बंदुकीचा धाक दाखवून ३० वर्षीय तरुणीवर बलात्कार…


पुणे : मेट्रो मिनियन वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर तीस वर्षीय तरुणीला भेटण्यासाठी बोलावले आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून समोर आली आहे.

हि घटना बाणेर परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये २४ जूनच्या रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल चंद्रकांत यादव (रा. सोना अपार्टमेंट औंध रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ३० वर्षीय पीडित तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी राहुल यादव आणि पीडित तरुणीची शादी डॉट कॉम या मेट्रोमेनियन वेबसाईटद्वारे ओळख झाली होती. आरोपीने या तरुणीचा विश्वास संपादन करून ओळख वाढवली.

आरोपीने २४ जूनच्या रात्री या तरुणीला भेटण्यासाठी बाणेर परिसरात बोलावले. त्यानंतर बाणेर परिसरातीलच एका नामांकित हॉटेलमध्ये घेऊन जात बंदुकीचा धाक दाखवून या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!