दुःखद! ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन…


मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, लेखक डाॅ. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी अभिनेत्री प्रमिती नरके असा परिवार आहे.

डाॅ. हरी नरके यांनी पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून काम पाहिलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे. त्याचबरोबर पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांचं उल्लेखनीय काम होतं.

प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादन, डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!