अभिनेते टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार ; तीन हल्लेखोर दुचाकीवरून आले, चालकासह तिघे जखमी ; बिश्णोई गँग समर्थकाची जबाबदारीची पोस्ट..


मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली असून, या घटनेमुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येत अचानक गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेत अभिनेता टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी टायगर श्रॉफलाच लक्ष्य का केले, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येऊ शकणार आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या, तसेच अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि कलाकारांसह चित्रपट निर्मात्यांना मिळणाऱ्या धमक्यांनंतर अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला झाला आहे.

सलमान खान आणि रोहित शेट्टी यांच्या घटनांचीही चर्चा

याआधी एप्रिल २०२४ मध्ये वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले होते.

फेब्रुवारी २०२६ मध्ये जुहू येथे चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेरही गोळीबार झाल्याचे वृत्त होते. या घटनांमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, टायगर श्रॉफवरील कथित हल्ल्याची माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. परंतु सोशल मीडियावर बिश्णोई गँगच्या समर्थकाने पोस्ट करुन
हल्लाची जबाबदारी घेतली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!