आज शिक्षक-पदवीधर निवडणुकांचा निकाल, सत्यजित तांबे यांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष


मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेला    पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले.

यामध्ये सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली होती. महाविकास आघाडी तसेच भाजपने देखील तयारी केली होती. आता दुपारपर्यंत या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे नाशिक विभागाची. नाशिक पदवीधरमध्ये सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतरच रंगत वाढली होती. त्यांना भाजपने देखील पाठिंबा दिल्याने निवडणुकीला वेगळे वळण लागले.

तसेच भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्या शुभांगी पाटील या ठाकरे गटाला जाऊन मिळाल्या. अमरावतीमध्ये कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विक्रम काळे तर भाजपकडून किरण पाटील हे आमने सामने आहेत.

कोकणात मविआचे उमेदवार बाळाराम पाटील रिंगणात आहेत. यांच्या विरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. भाजपने समर्थन दिलेले नागो गाणार हे नागपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विदर्भ माध्यमिक संघाचे सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्या प्रमुख लढत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!