आता आमच्यावर बलात्कार होऊ देणार नाही; मणिपूरच्या महिला मशाल घेऊन रस्त्यावर..

मणिपूर : मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटल्याचे पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेत चांगलाच घेराव घातला आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणी मणिपूर महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. या महिला हातात मशाल घेत सुरक्षा रक्षकांसह रात्री रस्त्यावर उतरल्या आहेत. या आंदोलनाला मीरा पैबी असे म्हटलं जाते.
या आंदोलनात मैतेई समाजातील महिला सहभागी झाल्या असून मणिपूरमध्ये या आंदोलनाला विशेष महत्त्व आहे. एखाद्या गोष्टीवर उपाय निघत नसेल तर या महिला नग्न आंदोलनाची धमकी देतात. त्यापुढे सुरक्षा दल आणि लष्कराचे जवान हतबल होतात.

मणिपूर ३ मे पासून धगधगत आहे. सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै रोजी या प्रकरणाची दखल घेतली असून न्यायालयाने मणिपूर सरकारला तात्काळ योग्य पावले उचलून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. सीबीआयकडून हिंसाचार आणि कट केल्यासंबंधीत एफआयआर दाखल करून या प्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.