सिंहगडावर जात असाल तर जाण्याआधी ही बातमी वाचा, गडावर दिसली धक्कादायक गोष्ट..

पुणे : पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक पर्यटक सिंहगडावर ट्रेकींग किंवा फिरण्याचा आनंद लुटतात. मात्र, आता सिंहगडावर जाताना १० वेळा विचार करावा लागणार आहे. सिंहगडाच्या घेऱ्यात बिबट्या आणि बछड्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला आहे. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये याबाबत नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितली आहे. घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन बिबट्याचा फोटो काढण्यात आला आहे.
पुण्यातील अनेकजण हे पावसाळ्यात सिंहगडावर जात असतात. आता सिंहगडावर जाताना विचार करावा लागणार आहे. याचे कारण म्हणजे सिंहगडाच्या घेऱ्यात बिबट्या आणि बछड्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये याबाबत नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितली आहे. यामुळे पर्यटकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला आहे.
घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन हे फोटो घेण्यात आले आहेत. यामुळे सध्या याठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता याठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. याठिकाणी एकटे जाऊ नये.
मोरदरी गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला आहे. पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर हा परिसर प्रामुख्याने बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. मात्र आता बिबट्या पुण्याच्या वेशीवर आल्याने चिंतेत भर पडली आहे.