राजकीय घडामोडींमागे शरद पवारच! राज ठाकरे यांनी सांगितले यामागचे कारण..

मुंबई : अजित पवार भाजपसोबत गेल्याने सध्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमागे राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांचा हात असू शकतो. राज्यात जे घडले ते घृणास्पद आहे. हे राज्यातील मतदारांचा अपमान करण्याशिवाय काही नाही.


शरद पवार यांनी महाराष्ट्रात हा ट्रेंड सुरू केल्याचे ते म्हणाले. तो प्रथम १९७८ मध्ये दिसला. पुलोद सरकारचा वापर केला. असे राजकीय चित्र महाराष्ट्राने पाहिले नव्हते. या सगळ्या गोष्टी पवारांपासून सुरू झाल्या आणि पवारांवरच संपल्या, असेही ते म्हणाले.
तसेच ते म्हणाले, सध्याच्या घडामोडींमागे खुद्द शरद पवार यांचा हात असू शकतो. स्वतःहून आणि ज्येष्ठ पवारांच्या आशीर्वादाशिवाय प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत जाणारे नेते नाहीत.
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच अनेक ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे बॅनर देखील लावण्यात आले होते. यावर अस होणार नाही असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.