राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, तुझाही दाभोळकर..


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत माहिती अशी की, तुमचा दाभोलकर करु’, अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली आहे.

यानंतर सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. या सर्वांची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते आहे.

ज्या पद्धतीने गृह विभाग अपयशी होत आहे याकडे अमित शाह यांनी लक्ष घालावं, अशी माझी विनंती असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले. यामुळे आता तपासात काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्या पद्धतीने ही धमकी आली ती दुर्दैवी आहे. राज्यात दडपशाही आणि गुंडाराज सुरु आहे. धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. जी धमकी आली आहे त्याच्या खाली त्याच पद्धतीने कमेंट्स करण्यात आल्या आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!