निलेश राणेच्या कानाखाली जो वाजवेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस! राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा..

मुंबई : निलेश राणेच्या कानाखाली जो वाजवेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. राणे परिवारातील वाचाळवीरांना, त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लवकरच लगाम घालावा, असे नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी म्हटले आहे.

अगोदरच राज्यातील परिस्थिती ठीक नाही. जातीय दंगलसदृश वातावरण आहे. असे असताना असताना जबाबदार व्यक्तींनी असे विधान करणे अतिशय चुकीचे आहे, असेही बाबा गुजर म्हणाले.
यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही याची दखल राणे कुटुंबीयांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.

दरम्यान, निवडणुका आल्या की शरद पवार मुस्लिमांना जवळ करतात, ते औरंगजेबाचा पुनर्जन्म आहेत. अशी जहरी टिका भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली होती.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. निलेश राणेंच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.