अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांनीही केला होता प्रवास? भाजपकडून मोठा दावा


मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या अपघातावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सातत्याने या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत.

व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता भाजपने रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले असून, भाजप नेते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातूनच प्रवास केला होता, असा दावा नवनाथ बन यांनी केला आहे. विशेष म्हणजे, रोहित पवार आणि अजित पवार यांनी एकाच विमानातून दिल्ली ते नागपूर असा प्रवास केल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रवास १० डिसेंबर २०२५ रोजी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

रोहित पवारांनी अपघातग्रस्त विमानातून प्रवास केला?

भाजप नेते नवनाथ बन यांच्या आरोपानुसार, रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला होता. या प्रवासावेळी सुमित कपूर हे पायलट, तर शांभवी या को-पायलट होत्या. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणातही याच पायलट आणि को-पायलटची नावे समोर आल्याचा दावा बन यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आपण कधीही व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला नसल्याचे सांगितले होते. मात्र, उपलब्ध तिकिटाच्या माहितीनुसार त्यांनी अजित पवार यांच्यासोबत त्याच विमानातून प्रवास केल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला आहे.

रोहित पवारांनी लपवालपवी का केली? नवनाथ बन यांचा सवाल

नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत रोहित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, रोहित पवार सातत्याने या प्रकरणात संशय निर्माण करत आहेत आणि वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून कधीही प्रवास केला नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, आता समोर आलेल्या तिकिटाच्या माहितीनुसार त्यांनी अजित पवार यांच्यासोबत प्रवास केल्याचे दिसत असल्याचा दावा बन यांनी केला.

तसेच, रोहित पवार यांनी दिल्ली-नागपूर प्रवास कोणत्या कारणासाठी केला होता? त्यांनी व्हीएसआर कंपनीचेच विमान का निवडले? पत्रकार परिषदेत त्यांनी विमान प्रवासाबाबत वेगळी माहिती का दिली? असे सवालही नवनाथ बन यांनी उपस्थित केले.

रोहित पवारांनी आरोपांना उत्तर देण्याची मागणी

ज्या विमानाचा अपघात झाला, त्याच विमानातून रोहित पवार आणि अजित पवार यांनी एकत्र प्रवास केला होता, असा दावा नवनाथ बन यांनी केला आहे. या प्रवासावेळी विमानात सुमित कपूर आणि शांभवी हेच पायलट आणि को-पायलट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या सर्व प्रश्नांवर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता नव्या आरोपांची भर पडली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!