मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचा निकाल समोर; देशातील कोणत्या मुख्यमंत्र्याने पटकावला पहिला क्रमांक? संपूर्ण यादी जाणून घ्या


मुंबई : फेम इंडिया मॅगझिन आणि एशिया पोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेस्ट चीफ मिनिस्टर सर्व्हे 2026’ जाहीर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाचे आणि नेतृत्वाचे मूल्यमापन करण्यात आले आहे. या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.

या सर्वेक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी १० प्रमुख निकष ठरवण्यात आले होते. यामध्ये सुशासन, कायदा आणि सुव्यवस्था, व्यक्तिमत्त्व, सार्वजनिक प्रतिमा, कार्यक्षमता, प्रभाव, विभागांची माहिती, लोकप्रियता, दूरदृष्टी आणि काम करण्याची पद्धत या बाबींचा समावेश होता.

प्रशासन किती पारदर्शक आहे, सरकारी अधिकारी किती जबाबदारीने काम करतात आणि सरकारी योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो का, याचाही आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारी नियंत्रण आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या मुद्द्यांनाही महत्त्व देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांची निर्णयक्षमता, संवादकौशल्य, जनतेशी असलेला संपर्क आणि राज्याच्या विकासासाठी आखलेले नियोजन या बाबींचेही परीक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन १ हजार गुणांच्या आधारे करण्यात आले असून, एकूण १५ मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाजी मारली आहे. त्यांची देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांना पहिला क्रमांक देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांचा राज्यातील विकासकामे, नागरिकांचे कल्याण, सुरक्षा आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे या सर्वेक्षणाच्या निकालानंतर देशातील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हे फेम इंडिया मॅगझिन आणि एशिया पोस्ट यांनी केलेले सर्वेक्षण असून, याला केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकृत मूल्यांकन समजू नये.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!