लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये? दिवाळीच्या आधी खात्यात पैसे जमा होणार का? महत्त्वाची माहिती समोर


मुंबई : राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून लाभार्थी महिलांना वितरित करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

ऑक्टोबर महिना सुरू झाल्याने सप्टेंबरसोबतच ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना लागली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची शक्यता समोर आली आहे. सरकारकडून दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित दिल्यास महिलांच्या खात्यावर थेट 3,000 रुपये जमा होऊ शकतात.

सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार?

सरकारने ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वितरित केला होता. मात्र, सप्टेंबर महिना संपूनही या महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. सप्टेंबरच्या हप्त्याच्या वितरणाबाबत अद्याप अधिकृत निर्णय किंवा जीआर जारी झालेला नाही.

दसऱ्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत यासंदर्भात जीआर निघाला नाही, तर हप्ता कधी मिळणार याबाबत आणखी प्रश्न निर्माण होऊ शकतात.

लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार?

सप्टेंबरचा हप्ता रखडलेला असताना आता ऑक्टोबर महिन्यालाही सुरुवात झाली आहे. पुढील महिन्यात दिवाळीचा सण असल्याने सरकार दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित देणार का, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

जर ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत सप्टेंबरच्या हप्त्याबाबत निर्णय झाला नाही, तर नोव्हेंबरमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, राज्यातील सुमारे 1 कोटी 66 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!