ब्रेकिंग! अखेर संसद भवनाचे उद्घाटन कोण करणार याचा निकाल लागला, न्यायालयाने दिला मोठा निकाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन करणार आहेत.
संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर 25 राजकीय पक्षांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सरकारचं निमंत्रण स्वीकारलं आहे.
दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयानं नवीन संसद भवनाच्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न करता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात यावं ही मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.