पुण्यातील बिबवेवाडी परिसरात तरुणाची दगडाने ठेचून हत्या, धक्कादायक कारण आले समोर…


पुणे : दारु पिऊन शिविगाळ केल्याने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात घडली आहे.

श्रीकांत मच्छिंद्र जाधव (वय – ३८, रा. -राजीव गांधी नगर, बिबबेवाडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पारेकर व त्याचे दोन साथीदार ( राहणार – बिबबेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावी आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, श्रीकांत जाधव हा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन काही दिवसांपूर्वी त्याने आरोपी सुनील पारेकरच्या घरासमोर शिवीगाळ केली होती. त्यामुळे सुनील पारेकरने श्रीकांतला दारू पिऊन याठिकाणी शिवीगाळ करू नको असे सांगितले.

गौतमी ही पाटील नावाची बदनामी करतेय! तिने आडनाव बदलावं; मराठा संघटनेचा थेट इशारा

त्यानंतर बुधवारी रात्री पुन्हा श्रीकांतने दारू पिऊन सुनीलशी वाद घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या सुनीलने आपल्या दोन मित्रांना बोलावून श्रीकांत जाधवला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी दगडाने ठेचून त्याची हत्या केली.

सिंहगडच्या लहूने एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा! पहिल्याच प्रयत्नात माऊंट एव्हरेस्टला गवसणी..

या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. श्रीकांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुनील पारेकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!