सिंहगडच्या लहूने एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा! पहिल्याच प्रयत्नात माऊंट एव्हरेस्टला गवसणी..


पुणे : एखादं स्वप्न मनाशी बाळगणं आणि त्यासाठी जीवाच रान करणं यानंतर जे यश मिळत ते कशातही मोजता येत नाही. असेच काहीसे सिंहगडच्या लहूने करून दाखवले आहे. सिंहगडच्या लहू उघडे याने मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता पहिल्या प्रयत्नात माऊंट एव्हरेस्टला गवसणी घातली.

स्वतःच्या शेतात काम करताना ट्रॅक्टर खाली सापडला शेतकरी, बारामती येथील युवा शेतकऱ्याचे दुःखद निधन..

यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सिंहगड किल्ल्यावर पायवाटेला आई सोबत लहू लहानपणापासून काकडी, लिंबूपाणी विकत होता. कितीतरीवेळा त्याने तो खालीवर केला.

हिंगोलीत मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात; 150 मेंढ्यांसह 5 जणांचा जागीच मृत्यू

हॉटेलचे साहित्य घरी ने आणि करताना त्याचं सह्याद्रीशी घट्ट नातं जडत गेले ते कायमचं. सह्याद्रीतील अनेक अवघड शिखर कडे कपारी सर करताना त्याला स्वप्न पडू लागली. ती जगातील सर्वोच्च शिखराची. यामुळे त्याने तयारी केली. दिवसातून दोन वेळा पाठीवर वीस किलो वजन घेऊन सिंहगड किल्ला चढायचा आणि उतरायचा.

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?, कारण ..

हे सगळं गेली दोन वर्ष सुरु होत. त्यामुळे शारीरिक व मानसिक तयारी जबरदस्त झाली होती. असे असले तरी त्याच्याकडे पैसे नव्हते, अनेकांकडून पैसे गोळा केले. तो नेपाळमध्ये गेला.मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते, मित्रांनी दोन दिवस मुदत राहिलेली असताना पैसे पाठवून दिले. यामुळे त्यांचे स्वप्न साकार झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!