हवेलीत राष्ट्रवादीत घडणार मोठा भूकंप! बाजार समिती व साखर कारखान्याला रसद मिळेना म्हणून पदाधिकारी ‘शिंदे’ सेनेच्या दारी! सत्ताधारी पक्षांचा श्रेयसंघर्ष संस्थांवर उठल्याने मजबूत राष्ट्रवादी होतेय हतबल…

जयदिप जाधव
उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील कायम सत्तेच्या जोखडात अडकलेल्या व तालुक्यातील अस्तित्वाचा संघर्षात अनेक वर्षे प्रशासकीय वळचणीत पडलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखाना या संस्था स्थानिक मुद्दांच्या पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षांच्या ‘राजकीय’ शिकार ठरु लागल्या आहेत. तालुक्यातील सत्ताधारी पक्षाची राजकीय भूमिका संस्थेच्या मुळावर उठल्याने या संस्थांचे एकमेकांशी निगडीत स्थानिक प्रश्न सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाकडून सुटत नसल्याने या संस्थांवर थेट कमांड असलेले दोघे भावंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह समर्थक पदाधिकाऱ्यांसह सत्तेतील आणखी एक भागीदार पक्षाचा ‘धनुष्यबाण’ उचलण्याचा तयारीत असल्याने हवेलीत राष्ट्रवादीत भूकंप घडणार असल्याने चर्चेला उधाण फुटले आहे.

हवेलीत अनेक वर्षे या संस्थांचा प्रश्न सुटत नसल्याची झळ तालुक्याला बसली आहे. या संस्थांना न्यायालयात जाऊन पुणे बाजार समितीव यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अनुक्रमे दोन व दिड दशकांचे प्रशासकीय राजवट संपविण्यासाठी न्यायालयात जाऊन संघर्ष करावा लागला आहे. तेंव्हाकुठे पुणे बाजार समितीची २० वर्षे तर यशवंत कारखान्यावरील १५ वर्षे प्रशासकीय राजवट संपवून तालुक्याच्या अस्तित्वाचे स्वप्न पाहता आले आहे. अशातच आता दोन्ही संस्थांच्या वाटाघाटीतून यशवंत सहकारी साखर कारखान्याचा अनेक वर्षे सभासदांनी मंजुरी देऊ केलेला जमीन विक्रीचा प्रश्न सुटल्याने या संस्थाचा तालुक्याच्या सहकारातील वळचळणीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.


आता तालुक्यातील बलाढ्य सहकारी संस्थांचे हे मुद्दे आता सत्ताधारी पक्षाचे श्रेयाचे केंद्रबिंदू ठरु लागलेअसून संस्थांचा श्रेयवाद संस्थेच्या अस्तित्वाचा गळा घोटू लागले असून श्रेयवाद हा संस्थेच्या हिताला बाधा देऊ लागल्याने साखर कारखाना सुरू करण्याचे सर्व प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या ‘निशाना’वर आल्याने या संस्थांचे अस्तित्वाचे पतन होऊ लागल्याची चर्चा आहे.
अशातच या संस्थांवरील राजकीय कमांड असलेल्या दोन्ही भावंडांच्या प्रयत्नांना एका सत्ताधारी पक्षाकडून ‘खो’ तर सत्ताधारी राष्ट्रवादी कडून अपेक्षित ताकद मिळत नसल्याने या पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा तिसरा भिडु ‘धनुष्यबाणा’शी हातमिळवणी चालू केली असून तालुक्यातील राजकारणात भूकंप घडणार असल्याने त्याची चाहूल सुरू सुरू झाली आहे.
अजित पवारानंतर ताकद मिळेना!
स्व. अजित पवार यांनी विधानसभेला या कारखान्याचा प्रश्न पुणे बाजार समितीमार्फत सोडवून देण्याचा शब्दतालुक्याला दिला होता. त्यानुसार त्यांनी या भावंडांना मोठी मदत उभी केली होती. त्यांनी या ठरावाला राज्य मंत्रिमंडळात कायदेशीर स्वरूप दिले होते. मात्र त्यांच्या पश्चात राज्य मंत्रिमंडळाचा ठराव मंजूर होऊन ही कायदेशीर त्रुटी काढल्या गेल्याने कारखान्याने पुणे बाजार समितीला ४९.१८ एकर जमीन पहिले खरेदीखत देऊनही संस्था पणन विभागाच्या स्थगिती निर्णयावर अडकून पडली आहे. अजित पवार यांच्यानंतर हा प्रश्न सोडविण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याची चर्चा आहे.
बाजार समितीच्या उपसभापतीपदावरुन वाद वाढला!
पुणे बाजार समितीच्या उपसभापतीपदाची नुकतीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत उपसभापतीपदावरून पुन्हा एकदा
वादाची ठिणगी पडली आहे. भाजपच्या बड्या नेत्याने या पदावर आपली मर्जी राखावी म्हणून थेट विचारणा केली असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपच्या मागणीला नकार मिळाल्याने या पदाधिकारी यांच्यात जोरात वाद घडला असल्याची चर्चा असल्याने आता हा संघर्ष कुठला टोकाला जाणार म्हणून चर्चा रंगू लागली आहे.