जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटल्याने सहा जणांचा मृत्यू

किश्तवाड : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण अपघात झाला. धरणावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटले. या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाण्याच्या टाकीने केला घात! टाकीत पडून उरुळी कांचन येथे दीड वर्षीय मुलाचा मृत्यू
मिळालेल्या माहिती नुसार, घटना डांगदुरु पॉवर प्रोजेक्टजवळ घडली. या प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन पलटी झाले. हा अपघात सकाळी बुधवारी (ता. २४) ८.३५ च्या सुमारास झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहिती आहे. तसेच जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इथे बचावकार्य सुरु आहे.

पुण्यात कचरा वाहतूक ठेकेदाराला तब्बल 9 कोटी 40 लाखांचा दंड, कारण

दरम्यान, किश्तवाड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक खलील पोसवाल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले की, अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १२ हुन अधिक लोक जखमी झाले आहेत.
अपघात झाला तो परिसर अतिशय दुर्गम आणि जिल्हा मुख्यालयापासून दूर आहे. मदत कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र हे सर्व मजूर स्थानिक असण्याची शक्यता आहे.