सावकाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी धुणी-भांडी करणारी महिला पोलीस ठाण्यात आली! तक्रारदार महिलेलाच पोलीस ठाण्यात धमकावले; उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह


उरुळीकांचन : मोलमजुरीसाठी दुसऱ्याच्या घरात धुणी भांडी करणाऱ्या महिलेला ३ लाख १४ हजार रुपये व्याजाने देऊन त्याबदल्यात १० लाख ८४ हजार रुपये रक्कम वसूल करुनही महिलेकडून व्याजाचा रक्कमेला सावकाराचा तकादा थांबत नसल्याने सावकाराविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार देणाऱ्या या महिलेला पोलिस ठाण्यात गाठून धमकी देऊन हुज्जत घालण्याचा प्रकार घडला आहे.

तक्रारदार महिलेवर पोलिस ठाण्यातच हुज्जत घालण्याचा प्रकार घडल्याने दोन्ही बाजूंनी उरुळीकांचन पोलिस ठाण्यातच गोंधळ घातल्याचा प्रकार झाल्याने सावकारकीने पिडीत झालेल्या महिलेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार घडला आहे. तर सावकारविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रमोद उर्फ परमेश्वर मोहन मार्कड (रा. उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकणी महिला उरुळीकांचन पोलिस ठाण्यात सावकारावर तक्रार देण्यासाठी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात आली असता तक्रारदार महिलेवर सावकाराकडून धमकी देऊन पोलिसांसमोर गोंधळ घालण्याचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या मोलमजुरीसाठी धुणीभांडी करण्याचे काम करतात. त्यांनी प्रमोद याच्याकडून ०८/०२/२०२५ पासून ३ लाख १४ हजाररुपये रक्कम व्याजाने घेतली आहे.

त्यापासून ते ०९/०८/२०२६ रोजी पर्यंत वेळोवेळी प्रमोद उर्फ परमेश्वर याने महिलेकडून वेळोवेळी १० लाख ८४ हजार रुपये रक्कम वसुल केली आहे. त्यानंतर हा सावकार महिलेला पैसे माघत असत. ‘तु मला एकटी भेट तुला लागतील तर अजुन पैसे देतो’, असे धमकी देऊन एकटीला भेटायला बोलवत होता तसेच तो सतत पाठलाग करत होता.

त्यासाठी तक्रारदार महिला उरुळीकांचन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली असता तक्रारदार महिलेलाच धमकी व पोलिस ठाण्यात गोंधळ घालण्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सावकार प्रमोद उर्फ परमेश्वर मार्कड याच्यावर सावकारीचा तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरुन महिलेवरही गुन्हा दाखल केला आहे.

अधिकाऱ्यासमोरच गोंधळ?

तक्रारदार महिला सावकाराविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्या असता पोलिस ठाण्यात काही अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच महिलांचा परस्पर गोंधळ घालण्याचा प्रकार घडल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात का आणता आली नाही ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रारदार महिलेला पोलिस ठाण्यात गाठण्याचा प्रकार पोलिसांच्या समोर घडल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!