शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा पहिला हप्ता कर्जखात्यात जमा; सरकारचा मोठा निर्णय


मुंबई : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे 6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात 5,029 कोटी रुपये जमा केले.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ही रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांना आता पीक कर्ज

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

दरम्यान, पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण होताच त्यांच्या कर्जखात्यावरही कर्जमाफीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पहिली यादी ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली असून शेतकऱ्यांना केवळ आधार प्रमाणीकरण करायचे आहे. यासाठी स्वतंत्र अर्जाची आवश्यकता नाही.

बँकांकडून काही खात्यांमध्ये त्रुटी राहिल्याने सुमारे 12 लाख खाती पुन्हा बँकांकडे पाठवण्यात आली आहेत. या त्रुटी आठवडाभरात दुरुस्त करून खाती पुन्हा प्रक्रियेत आणली जातील. त्यानंतर पात्र खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, यापुढेही पात्र शेतकऱ्यांची खाती जसजशी मंजूर होतील, तसतशी कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यांवर जमा केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!