राज्यात शिक्षकांची मेगाभरती! 30 हजार 209 पदांसाठी प्रक्रिया सुरू; अर्जाची शेवटची तारीख काय?

मुंबई : राज्यात शिक्षक होण्याची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शाळांमध्ये तब्बल 30 हजार 209 रिक्त पदांची शिक्षक भरती केली जाणार आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदांचा यामध्ये समावेश आहे.
या भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टल खुले झाले असून 6 ऑगस्टपासून उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. उमेदवारांना 11 ऑगस्टपर्यंत आपला पसंतीक्रम लॉक करणे आवश्यक आहे.

शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. TAIT परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी अधिकृत पवित्र पोर्टलवर दिलेल्या मुदतीत पसंतीक्रम लॉक करणे बंधनकारक आहे. त्यानंतर 19 हजार 881 पदांसाठी मुलाखतीशिवाय पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.


कुठे किती पदे?
जिल्हा परिषद – 13,351
महानगरपालिका – 1,954
नगरपालिका/नगरपरिषद – 280
आदिवासी विकास विभाग – 2,421
शासकीय विद्यानिकेतन – 56
खासगी शिक्षण संस्था – 12,148
इयत्तेनुसार रिक्त पदे
इयत्ता 1 ली ते 5 वी – 14,320
इयत्ता 6 वी ते 8 वी – 10,012
इयत्ता 9 वी ते 10 वी – 5,513
इयत्ता 11 वी ते 12 वी – 364
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जाहिरात देण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी मिळाल्यानंतर संबंधित संस्थेला रिक्त पदांची भरती प्रक्रिया तीन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे शिक्षक होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.