शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना राजकीय बळ! महत्त्वाच्या संस्थेवर केली निवड, पवार कुटुंब पुन्हा एकत्र..


बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांची बारामतीच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या मानद सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे शरद पवार यांनी त्यांना महत्वाची जबाबदारी दिली आहे. यामुळे शरद पवार यांनी त्यांना आगामी काळात ताकद दिल्याचे दिसून आले आहे.

ही निवड संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र दिसून आले आहे.

युगेंद्र पवार यांची शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या मानद सदस्यपदी निवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार म्हणून काम पाहत आहेत. तसेच बारामतीच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

दरम्यान, ही संस्था बारामती परिसरामध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरवण्याचे कार्य करते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार शरद पवार एकत्र आल्याने या सोहळ्याकडे अनेकांच्या नजरा लागल्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा विलीनीकरणाचा निर्णय अद्याप झालेला नाही.

असे असताना मात्र याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू झाल्या आहेत. आता शरद पवार गट भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांचे एकाच व्यासपीठावर एकत्र येणे महत्त्वाचे मानले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!