अखेर लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! एकनाथ शिंदेंनी टेन्शन मिटवलं, सभेत मोठी घोषणा


मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त धडाकेबाज भाषण केले. यावेळी त्यांनी पक्षाची भूमिका, आगामी वाटचाल आणि संघटनेची दिशा यावर सविस्तर भाष्य केले. तसेच खासदार फुटीच्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे सूचक विधान करत “पुढे पुढे काय घडतंय ते पाहात राहा” असे वक्तव्य केले.

आपल्या भाषणात त्यांनी पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही, कार्यकर्ता पुढे आला पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. महायुती कायम राहील, असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. आमचा अजेंडा खुर्ची नसून लोकांच्या जीवनात बदल घडवणे आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात महायुती वेगाने पुढे जात असून विकासकामांना वेग मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी आणि वारकरी सुखी झाले पाहिजेत, हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे म्हणाले की, ही योजना त्यांनी आई आणि बहिणींच्या कष्टातून प्रेरणा घेऊन सुरू केली. या योजनेत अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, पण “कोणीही आला तरी योजना बंद होऊ देणार नाही” असा ठाम शब्द त्यांनी दिला.

शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम करत असल्याचे सांगत त्यांनी वशिलेबाजीला विरोध असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. राज्यसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देत ज्योतीताई वाघमारे यांना उमेदवारी दिल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

मंचावर अनेकांनी आपल्या मुलांसाठी तिकीट मागितले, मात्र कार्यकर्त्यांना संधी देण्यावर आपण ठाम राहिलो, असेही त्यांनी सांगितले. सहकाऱ्यांचे पाठबळ हे आपले बळ असून असे सहकारी मिळणे हे भाग्याचे आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!