SBI मध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती! 1500 जागांसाठी अर्ज सुरू; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया


मुंबई : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या State Bank of India ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी 1500 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी 18 जूनपासून सुरू झाली आहे. अर्जदारांचे वय 1 एप्रिल 2026 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही अर्जाची संधी देण्यात आली आहे.

खुल्या प्रवर्ग, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये ठेवण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना प्रारंभी 48,480 रुपये मूळ वेतन मिळणार असून विविध भत्ते आणि सुविधांसह वार्षिक पॅकेज सुमारे 21.97 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या भरतीकडे लाखो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी, गटचर्चा आणि मुलाखत अशा टप्प्यांत पार पडणार आहे. अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!