लोणावळ्यात खळबळ! 9 तरुण अन् 7 तरुणींसह बंगल्यात सुरू होतं विचित्र कांड, मध्यरात्री अचानक पोलिसांचा छापा अन् उघड झाला धक्कादायक प्रकार


लोणावळा : पर्यटननगरी लोणावळ्यात एका बंगल्यावर मध्यरात्री पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 16 तरुण-तरुणींसह एकूण 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठ्या आवाजात संगीत, मद्यपान आणि सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

लोणावळा शहर पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (15 जून) पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे विशेष पथक नियमित गस्तीवर होते. यावेळी भांगरवाडी परिसरातील पुराणिक सोसायटीमधील एका बंगल्यातून मोठ्या आवाजात संगीत आणि गोंधळ सुरू असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला. तपासादरम्यान तेथे अनेक तरुण-तरुणी उपस्थित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी संगीत बंद करून उपस्थित व्यक्तींविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई केली.

या प्रकरणात बंगल्यात उपस्थित 16 जणांसह बंगल्याचा मालक आणि केअरटेकर अशा एकूण 18 जणांविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पर्यटनस्थळांवरील बंगले आणि फार्महाऊसमध्ये नियमांचे उल्लंघन करून आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांचे लक्ष असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!