आज पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त? घराबाहेर पडण्यापूर्वी तपासा तुमच्या शहरातील नवीन दर…

पुणे : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मिश्र चित्र पाहायला मिळाले. काही शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर राहिले, तर काही ठिकाणी किरकोळ वाढ आणि घट नोंदवण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर तपासून घेणे आवश्यक ठरणार आहे.

आज जयपूर आणि भुवनेश्वरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून, बंगळुरू आणि लखनौमध्ये इंधन स्वस्त झाले आहे. दिल्ली आणि नोएडामध्ये दर स्थिर राहिले आहेत.
दिल्लीमध्ये पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. नोएडामध्येही दरांमध्ये कोणताही बदल नसून पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.56 रुपये प्रति लिटर आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल 8 पैशांनी स्वस्त होऊन 102.69 रुपये, तर डिझेल 95.36 रुपये प्रति लिटर झाले आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. येथे पेट्रोल 69 पैशांनी महागून 113.35 रुपये, तर डिझेल 61 पैशांनी वाढून 98.39 रुपये प्रति लिटर झाले आहे. भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 24 पैशांनी वाढून 109.05 रुपये आणि डिझेल 100.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 111.21 रुपये प्रति लिटर असून त्यात 3 पैशांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्येही पेट्रोल 4 पैशांनी महागून 107.88 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
दरम्यान, बंगळुरूमध्ये वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. येथे पेट्रोल 28 पैशांनी स्वस्त होऊन 110.60 रुपये प्रति लिटर झाले असून डिझेलचा दर 98.54 रुपये प्रति लिटरवर आला आहे. लखनौमध्ये पेट्रोल 19 पैशांनी घसरून 101.86 रुपये आणि डिझेल 95.36 रुपये प्रति लिटर झाले आहे. पाटणामध्येही पेट्रोल 18 पैशांनी कमी होऊन 113.54 रुपये प्रति लिटरवर आले आहे.